२७ जण अजूनही बोगद्यात अडकले
गंगटोक (सिक्किम) – राज्यातील नामची येथे निर्माणाधीन (काम चालू असलेल्या) बोगद्यात दरड (डोंगराचा तुटलेला कडा) कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ८ कामगारांचा मृत्यू झाला,तर २७ कामगार अजूनही ढिगार्याखाली अडकले आहेत. २० जुलैला हा अपघात झाला. हा बोगदा ‘नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन’च्या ‘तिस्ता स्टेज-६’ जलविद्युत् प्रकल्पाचा भाग म्हणून बांधला जात होता. या बोगद्याचे प्रवेशद्वार २० जुलै या दिवशी दरड कोसळल्याने बंद झाले.
१. अपघातानंतर बोगद्यात मिथेन वायूची गळती होऊन तोे दीड किलोमीटरपर्यंत पसरला. ऑक्सिजनची कमतरता भासल्यामुळे आणि गुदमरल्यामुळे ८ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
२. अडकलेल्यांमध्ये ‘पटेल इंजिनिअरिंग’ आस्थापनाचे २१ आणि ‘नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन’चे ६ कर्मचारी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
३. घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस आणि अग्निशमन दल यांच्याकडून युद्धपातळीवर बचावकार्य चालू आहे.
४. मिथेन वायू, अंधार आणि ऑक्सिजनची कमतरता यांमुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत असून विशेष ‘अँटी-गॅस गिअर’सह अतिरिक्त बचाव पथकेही पाचारण करण्यात आली आहेत. मृतांची ओळख अद्याप उघड केलेली नाही.

काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !