नगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गैरव्यवहार प्रकरणी ५ अधिकार्‍यांवर गुन्हा नोंद !

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वर्ष २०१५-१६ मध्ये कोंभळी (ता. कर्जत) येथे संगनमताने खाटे दस्तऐवज सिद्ध करून ९ सहस्र ३२० रुपयांचा, तर चांदे खुर्द येथे ५८ सहस्र २४८ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे नोंद केले आहेत.

मुंबई पोलीस आयुक्तांचा आदेश आणि सर्वाेच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्त्वे !

‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत किंवा विनयभंग प्रकरणी तक्रार आल्यास संबंधित व्यक्तीला तात्काळ अटक करण्यापूर्वी पोलीस उपायुक्तांची अनुमती घ्यावी’, असा निर्णय पोलीस आयुक्त पांडे यांनी घेणे….

जात प्रमाणपत्र रहित करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका संभाजीनगर खंडपिठाने फेटाळली !

जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लताबाई सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यांचे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले होते.

हिंदूंची परकियांनी बळकावलेली तीर्थक्षेत्रे परत मिळवण्यासाठी समर्पितभावाने प्रयत्न करणारे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन !

धर्म आणि देवता यांच्यासाठी लढणारे पू. (अधिवक्ता) हरी शंकर जैन आणि अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्याप्रती हिंदू समाज ऋणी राहील !

युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात लढण्यास गेलेल्या २ ब्रिटिश आणि  मोरोक्कोच्या एका नागरिकाला रशियाकडून मृत्यूदंडाची शिक्षा

रशियाच्या सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या २ ब्रिटिश आणि मोरोक्कोच्या एका नागरिकाला रशिया समर्थनक डोनबास भागात अटक करण्यात आली होती.

पाणीपुरवठ्याच्या नवीन कामाचा प्रस्ताव १५ जूनपूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पाठवा ! – संभाजीनगर खंडपीठ

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ४० दिवस कामामध्ये गंभीरपणे प्रगती केली नाही, याविषयी न्यायालयाने अप्रसन्नता व्यक्त करतांना प्रत्येक बुधवारी सुनावणी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. प्रसिद्ध होणार्‍या बातम्यांचीही नोंद घ्यावी, असेही खंडपिठाने म्हटले आहे.

रथयात्रेला अनुमती देण्याविषयी मद्रास उच्च न्यायालयाचा निवाडा !

रथयात्रेत प्रशासनाचे योग्य ते सहकार्य असावे. यासमवेतच स्थानिक स्वराज संस्थेला आदेश देण्यात आले की, त्यांनी रस्त्यांची व्यवस्था नीट करावी. तसेच विद्युत् मंडळानेही विजेचा पुरवठा व्यवस्थित करावा – मद्रास उच्च न्यायालय

कर्नाटक सरकार १ ऑगस्टपर्यंत बेवारस गायींसाठी १५ गोशाळा उभारणार !

न्यायालयाने सांगितले की, प्रत्येक तालुका आणि गाव स्तरांवर एक गोशाळा असणे आवश्यक आहे. जर एका जिल्ह्यात एकच गोशाळा असेल, तर त्यामध्ये बेवारस गायींच्या संख्येवर मर्यादा येतील.

मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमण हटवून ती भूमी पुन्हा मंदिराला देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश

असा आदेश देण्यासह मंदिराची भूमी बळकावणारे, तसेच त्याविषयी बघ्याची भूमिका घेणारे प्रशासकीय अधिकारी यांच्यावरही न्यायालयाने कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !

नूपुर शर्मा यांचे विधान वैध कि अवैध, ते न्यायालय ठरवेल ! – विश्‍व हिंदु परिषद

जर असे आहे, तर ‘भाजपने नूपुर शर्मा यांना निलंबित का केले ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !