युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात लढण्यास गेलेल्या २ ब्रिटिश आणि  मोरोक्कोच्या एका नागरिकाला रशियाकडून मृत्यूदंडाची शिक्षा

कीव (युक्रेन) – रशियाने युक्रेनविरुद्ध गेल्या १०७ दिवसांपासून पुकारलेले युद्ध अद्याप चालू आहे. रशियाच्या सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या २ ब्रिटिश आणि मोरोक्कोच्या एका नागरिकाला रशिया समर्थनक डोनबास भागात अटक करण्यात आली होती. या नागरिकांना आता मृत्यूदंड ठोठावण्यात आला आहे. येथील रशियाच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. या न्यायालयास आंतरराष्ट्रीय मान्यता नाही. ब्रिटनने ‘हे निर्णय आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे’, असे म्हटले आहे. विविध देशांतून १६ सहस्रांंहून अधिक स्वयंसेवक रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनमध्ये गेले होते.

सौजन्य channel4