नूपुर शर्मा यांचे विधान वैध कि अवैध, ते न्यायालय ठरवेल ! – विश्‍व हिंदु परिषद

डावीकडून नूपुर शर्मा आणि विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार

नवी देहली – नूपुर शर्मा यांचे विधान वैध कि अवैध ? हा गुन्हा आहे कि नाही, हे न्यायालयच ठरवू शकते; पण न्यायालयाच्या निकालाची वाट बघण्याआधीच देशभर हिंसाचार केला जात आहे, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी व्यक्त केले आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह विधान केल्यानंतर केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर आलोक कुमार यांनी हे वक्तव्य केले.

आलोक कुमार यांनी नूपुर शर्मा यांचा निषेध करण्यासाठी होत असलेल्या निदर्शनांवर आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, ‘‘न्यायालयाच्या निकालची वाट न बघता हिंसक निदर्शने कशी होऊ शकतात ? हा हिंसाचार कायदेशीर आहे का ? ‘प्रेषित पैगंबर यांच्या संदर्भात कुणी काही बोलले, तर जीभ छाटून टाकली जाईल’, अशी जाहीर धमकी दिली जात आहे. अशा भाषेत कोण कसे बोलू शकते ? धमकी देणारे लोक कायदा हातात घेत असून ही अतिशय चिंतेची गोष्ट म्हणावी लागेल.’’

संपादकीय भूमिका

जर असे आहे, तर ‘भाजपने नूपुर शर्मा यांना निलंबित का केले ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !