पाटण (गुजरात) येथील रोटलिया हनुमान मंदिरातील भजनाच्या कार्यक्रमामध्ये गोळा झाल्या ५० सहस्र भाकर्‍या !

प्रसिद्ध लोकगायक कीर्तीदान गढवी यांच्या भजनाच्या कार्यक्रमामध्ये प्रवेश करण्यासाठी १ ते १० भाकर्‍या आणण्याचे तिकीट ठेवण्यात आले होते. नंतर या भाकर्‍या गाय, श्‍वान आणि अन्य पशू अन् प्राणी यांना देण्यात आल्या.

सतना (मध्यप्रदेश) येथील मैहर शारदादेवी मंदिरातील मुसलमान कर्मचार्‍यांना हटवण्याचा आदेश

हिंदूंच्या मंदिरात अन्य धर्मियांचे काय काम ? हिंदूंच्या मंदिरात हिंदू कर्मचारी नियुक्त का केले जात नाहीत ?

कासेगाव (जिल्हा सोलापूर) येथे शंभु महादेव कावड यात्रा उत्साहात पार पडली !

शिखर शिंगणापूर येथे शंभु महादेवाचे मंदिर बांधणार्‍या राजा सिंघणदेव यांच्या कार्यकाळात त्यांचे प्रधान हेमाद्रीपंत यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव (तालुका दक्षिण सोलापूर) येथे शिंगणापूरसारखीच रचना असणारे मंदिर बांधण्यात आले.

इटलीमध्ये पाण्याखाली सापडले नबातियन संस्कृतीशी संबंधित प्राचीन मंदिर !

मंदिराचे अवशेष सापडल्यानंतर आता पुढील शोधकाम चालू करण्यात आले आहे. मंदिराची आणखी माहिती गोळा केली जात आहे.

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) शहरातील श्री देवी महालक्ष्मी मंदिरासह परिसर विकासासाठी सवा कोटी रुपयांचा निधी संमत !

सभामंडपाचे नूतनीकरण, व्यासपीठ, धर्मशाळा बांधकामास हा निधी मिळाला आहे.यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे

म्हापसा येथील महारुद्र देवस्थानची मंदिर प्रवेश करतांना भारतीय पोशाख घालण्याची भक्तांना सूचना !

गोवा राज्यातील प्रत्येक मंदिरामध्ये पारंपरिक पोशाख बंधनकारक केला पाहिजे, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

सरकार जर धर्मनिरपेक्ष आहे, तर त्यांनी मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे ! – परमहंस डॉ. अवधेशपुरी महाराज, ‘स्वस्तिक पीठा’चे पीठाधीश्वर, उज्जैन

सरकार केवळ हिंदूंची मंदिरे नियंत्रणात का घेत आहे ? सरकार जर धर्मनिरपेक्ष आहे, तर त्यांनी मंदिरांप्रमाणे मशिदी, चर्च यांचेही अधिग्रहण करावे.

विश्व हिंदु परिषदेने विझवला श्रीजानाई-मळाई डोंगरावरील वणवा !

खिंडवाडी गावचे आराध्यदैवत श्रीजानाई-मळाईदेवीच्या डोंगरावर अचानक वणवा लागला होता. तब्बल ५ घंट्यांच्या अथक परिश्रमानंतर विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांना हा वणवा विझवण्यात यश मिळाले.

भिवंडी (ठाणे) येथील ऐतिहासिक वज्रेश्‍वरी मंदिराच्या पर्यवेक्षकपदी ख्रिस्ती व्यक्तीची नियुक्ती !

मंदिराच्या पर्यवेक्षक म्हणून एकही हिंदु व्यक्ती उपलब्ध होऊ नये, याविषयी हिंदूंनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे !

उमेदवारी मिळण्यासाठी कर्नाटकातील काँग्रेस आमदाराच्या समर्थकांकडून मंदिर आणि मशीद येथे प्रार्थना !

काँग्रेसमध्ये व्यक्तीनिष्ठता बोकाळली असल्याचेच हे उदाहरण आहे. कधी पीडित हिंदूंच्या हितासाठी, तसेच त्यांना न्याय मिळण्यासाठी काँग्रेसवाल्यांनी प्रार्थना केली आहे का ?