
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – शहरातील श्री देवी महालक्ष्मी मंदिरासह परिसर विकासासाठी सवा कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे. यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिर शहरासह परिसराचे श्रद्धास्थान आहे. मध्यवर्ती भागातील मंदिरामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. सभामंडपाचे नूतनीकरण, व्यासपीठ, धर्मशाळा बांधकामास हा निधी मिळाला आहे.

या संदर्भात श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तारळे म्हणाले, ‘‘राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार विनय कोरे, भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यामुळे संमत झालेल्या सवा कोटी रुपयांच्या निधीतून ठराविक कामे होणार आहेत. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी २ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून त्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे.’’
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !