मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करूया ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
‘सरकार अधिसूचना देऊन त्या आधारे ठराव करून विशिष्ट मंदिरे कधीही कह्यात घेऊ शकते. त्यामुळे आपल्या मंदिरांवर ही टांगती तलवार आहेच. मोठ्या प्रमाणात निधी येणारी मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत आणि हे पैसे इतर कामांसाठी वापरले जात आहेत.