बरेली येथील मुसलमानबहुल गावातील ग्राम प्रधान शमशुल याचे हिंदूंवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन !

गावातील मंदिराच्या बांधकामाला विरोध

प्रतिकात्मक चित्र

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील मुसलमानबहुल बैरमनगर गावाचा ग्राम प्रधान शमशुल गावातील मुसलमानांना गावातील हिंदूंवर आर्थिक बहिष्कार घालण्यासाठी चिथावणी देत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यामध्ये मुसलमान ‘नारा-ए-तकबीर’ (अल्ला सर्वांत मोठा आहे) अशी घोषणा करतांना दिसत आहे. पोलिसांकडून या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.

या गावात मंदिर बांधण्यावरून वाद झाला आहे. जेथे मंदिर बांधण्यात येत आहे तेथे पूर्वी विहीर होती. आता तेथे मंदिरासाठी लागणार्‍या विटा ठेवण्यात आल्या आहेत. शमशुल याने या विटा हटवण्यासाठी हिंदूंना सांगितले होते. यावरून वाद झाला होता आणि त्या वेळी पोलिसांनी दोघांमध्ये समेट घडवून आणला होता.

संपादकीय भूमिका

  • एक गाव, एक जिल्हा आणि एक राज्य मुसलमानबहुल झाले, तर काय होते, याचा अनुभव घेऊनही धर्मनिरपेक्षतेच्या नशेत रहाणारे हिंदू आत्मघात करून घेत आहेत, हे त्यांच्या कधी लक्षात येणार ?
  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचे धाडस होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !