नागपूर येथे हनुमान मंदिरातील गदा घेऊन जाणार्‍या चोरट्याने गदा परत आणून दिली !

नागपूर येथे हनुमान मंदिरातील गदा घेऊन जाणार्‍या चोरट्याने गदा परत आणून दिली

नागपूर – जिल्ह्यातील कन्हान येथील चंद्रिका बाजार परिसरातील हनुमान मंदिरात एका चोरट्याने हनुमाची गदा चोरून नेली; मात्र नंतर त्याच चोरट्याने ती गदा मंदिरात परत आणून ठेवली. ही घटना ९ ऑक्टोबरच्या रात्री ८ वाजता घडली.

चोरट्याने हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर प्रसादही ग्रहण केला; मात्र प्रदक्षिणा घालतांना हनुमंताची पितळ्याची गदा चोरून नेली होती. त्या चोरट्याने हनुमंताच्या गदेसह पूजेचे इतर काही साहित्य पळवले होते. दुसर्‍या दिवशी मंदिर समितीने घटनेची तक्रार कन्हान पोलीस ठाण्यात दिली. या संदर्भात सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे चित्रण पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. हा व्हिडिओ अनेकांपर्यंत पोचला. व्हिडिओ प्रसारित झाल्याने आपण पकडले जाऊ या भीतीने चोरट्याने गदा परत आणून ठेवली. मंदिर समितीच्या सदस्याने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या चोराला कह्यात घेतले. त्याने ‘माझ्या हातून नकळत चूक झाली’, असे सांगितले. ‘हा चोरटा अनेकदा लोकांच्या वस्तू उचलून घेतो’, अशी माहिती पोलिसांना त्याच्या कुटुंबियांनी दिली.