सातारा, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – कराड तालुक्यातील पोतले येथील श्री मारुति मंदिरातील दानपेटी चोरांनी फोडली आहे. या दान पेटीतील अनुमाने एक ते दीड लाख रुपयांची रोख रक्कम चोरांनी चोरून नेली असल्याची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात प्रविष्ट करण्यात आली आहे.
पोतले येथील जुन्या गावठाणात श्री मारुति मंदिर आहे. १३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री चोरांनी मंदिराचे कुलूप तोडून दानपेटी फोडली. सकाळी ६.३० वाजता ग्रामस्थ मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर ही घटना उघड झाली. ग्रामस्थांनी पेटीचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारील रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर ही दानपेटी आढळून आली.
संपादकीय भूमिका
|