नाशिक – सप्तश्रृंगी गडावर बोकड बळीला उच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे; मात्र न्यायालय हे संरक्षण आणि कल्याणकारी निर्णय घेण्यासाठी केलेली व्यवस्था आहे; पण जर न्यायालय चुकीचा किंवा समाजघातक निर्णय घेत असेल, तर त्याचा आपण सर्वांनी सुजाण नागरिक म्हणून विरोध करायला हवा, असे मत व्यक्त करत महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी बोकड बळीच्या निर्णयाला विरोध केला आहे.
सप्तश्रृंगी गडावर दसर्याला बोकडबळी देण्याची प्रथा अनेक वर्षांपासून आहे. आदिवासी बांधवांच्या सान्निध्यात श्री सप्तश्रृंगीमातेचे स्थान असल्याने ते हा विधी करत असतात. या विधीला शेकडो भाविक उपस्थित असतात. ‘बोकड बळी न दिल्यास गडावर आपत्ती कोसळते’, असा भाविकांचा समज आहे.