(म्‍हणे) ‘मंदिरात महिलांचे शोषण केले जाते !’

आम आदमी पक्षाचे गुजरात प्रदेशाध्‍यक्ष गोपाल इटालिया यांचे संतापजनक विधान

आम आदमी पक्षाचे गुजरात प्रदेशाध्‍यक्ष गोपाल इटालिया

कर्णावती (गुजरात) – आम आदमी पक्षाचे गुजरात राज्‍याचे प्रदेशाध्‍यक्ष गोपाल इटालिया यांनी ‘मंदिरात, तसेच प्रवचनाला महिलांनी जाऊ नये, तेथे त्‍यांचे शोषण केले जाते’, असे विधान केले. भाजपचे सामाजिक माध्‍यम प्रमुख अमित मालवीय यांनी त्‍यांच्‍या टि्‌वटर खात्‍यावर गोपाल इटालिया यांच्‍या या विधानाचा व्‍हिडिओ प्रसारित केला आहे. यापूर्वी इटालिया यांनी पंतप्रधान मोदी यांना ‘नीच’ म्‍हटले होते, तसेच हिंदूंच्‍या देवतांविषयीही आक्षेपार्ह विधाने केली होती.

या व्‍हिडिओत गोपाल इटालिया हे हरिमोहन धवन आणि अरुण कुमार यांचे एक पुस्‍तक दाखवत आहेत. त्‍या वेळी ते म्‍हणत आहेत ‘मी माझ्‍या माता आणि भगिनी यांना विनंती करतो की, मंदिरात आणि प्रवचनला जाऊ नका. तेथे जाऊन तुम्‍हाला काहीही मिळणार नाही. ही महिलांची शोषण करणारी ठिकाणे आहेत. तुम्‍हाला जर तुमचे हक्‍क हवे असतील, तसेच तुम्‍हाला या देशावर राज्‍य करायचे असेल, तर प्रवचनात नाचण्‍यापेक्षा हे पुस्‍तक वाचा’, असे आवाहन गोपाल इटालिया करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • गुजरातमध्‍ये भाजपचे सरकार असतांना इटालिया यांच्‍यावर अद्याप कारवाई का झाली नाही ?, असा प्रश्‍न हिंदूंच्‍या मनात उपस्‍थित होतो !
  • मदरशांमध्‍ये आणि चर्चमध्‍ये महिलांचे शोषण होते, याची असंख्‍य उदाहरणे देशात अन् विदेशांत दिसून आली आहेत आणि येत आहेत, असे असतांना त्‍या संदर्भात कोणताही निधर्मीवादी नेता कधी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्‍या !
  • देहलीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्‍या सरकारकडून ज्‍येष्‍ठ नागरिकांना देशातील तीर्थक्षेत्री, तसेच मंदिरांमध्‍ये विनामूल्‍य दर्शनासाठी योजना राबवली जात आहे. त्‍यामुळे केजरीवाल यांना इटालिया यांचे विधान मान्‍य आहे का ? नसेल, तर ते त्‍यांच्‍यावर कारवाई कधी करणार आहेत, हे त्‍यांनी सांगायला हवे !