देशभक्त आणि आध्यात्मिक व्यक्तींचे चरित्रलेखन करणार्‍या ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन !

ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी (वय ९५ वर्षे) यांचे २७ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १ वाजता तुळशीबागवाले कॉलनीतील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

‘अर्जुना रिव्हरसाइड फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.’ची स्थापना !

शेतकर्‍यांची उन्नती होण्याच्या दिशेने प्रत्यक्षात काहीच होतांना दिसत नाही, ही वस्तूस्थिती आहे. यावर उपाय म्हणजे शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन स्वतःच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे. याच उद्देशाने कोकणातील राजापूर तालुक्यातील तळवडे येथे ‘अर्जुना रिव्हरसाइड फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.’ची स्थापना करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच महापालिकांच्या निवडणुका होणार !

राज्यशासन जानेवारी मासात या निवडणुका घेणार आहे, असे काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे’, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

जांबसमर्थ (जालना) येथील समर्थ रामदासस्वामी यांच्या देवघरातील मूर्ती चोरणार्‍या २ धर्मांध मुसलमानांना अटक !

शेख हुसेनला अटक करून त्याच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेने ४ मूर्ती कह्यात घेतल्या. मुख्य आरोपी शेख जिलानी हा अद्याप पसार आहे. मूर्तीचोर आणि विकत घेणारा अशा दोघांना पकडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुंबई येथील डॉ. नरेंद्र दाभोलकर कला प्रदर्शनाच्या उद्घाटनाला अंनिसमधील दुफळी पुन्हा एकदा उघड !

इस्लाममध्ये असलेल्या अंधश्रद्धा नसिरूद्दीन शाह यांना ठाऊक आहेत, तर त्या विरोधात ते आणि अंनिसवाले एकत्रित लढा का देत नाहीत ? केवळ हिंदूंच्या सण-उत्सव यांना अंधश्रद्धा ठरवणार्‍या अंनिसवाल्यांचा हिंदुविरोधी मुखवटा उघड होतो !

दिवाळीनिमित्त कोपर्डी हवेली (तालुका कराड) येथे प्रवचन पार पडले !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘दिवाळी सणाचे महत्त्व’ तसेच ‘हलालमुक्त दिवाळी कशा पद्धतीने साजरी करावी ?’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी ४० युवक-युवती ग्रामस्थ उपस्थित होते.

राज्यातील रेल्वेस्थानकांवरील कोट्यवधी रुपयांची शेकडो ‘वॉटर वेंडिंग मशिन’ बंद !

बहुसंख्य फलाटांवरील यंत्रे बंद पडली आहेत, याचा अर्थ ‘ही यंत्रे बंद पडली आहेत कि बंद पाडली गेली आहेत ?’, याविषयीचा संशय बळावतो. रेल्वेफलाटावरील पाण्याच्या बाटल्या विकणार्‍या दुकानदारांचा यामागे हात आहे का ? याचाही शोध प्रशासनाने घ्यायला हवा !

खासगी ट्रॅव्हल्सकडून आकारल्या जाणार्‍या भाडेवाढीविरोधात परिवहन अधिकार्‍यांची ‘नागरिकांनी तक्रार करावी’, अशी अपेक्षा !

असे असले, तरी ज्या गोष्टी प्रशासनाला ठाऊक आहेत, त्याविषयी प्रशासन निष्क्रीय रहात असेल, तर प्रशासन नावाचा पांढरा हत्ती हवा कशाला ?

मुले आई-वडिलांचा सांभाळ करत नसतील, तर संपत्ती परत मिळवता येते !

सोरेगांव येथील ‘ब्रिजधाम’ वृद्धाश्रमात आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. न्यायाधीश पाटील यांनी मृत्यूपत्र कशाप्रकारे सिद्ध करावे ? याविषयीही ज्येष्ठ नागरिकांना माहिती दिली.

शाळांमधील अल्प पटसंख्येत शिक्षण नीट होत नाही ! – हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ञ

अल्प पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे सध्या वादळ उठले आहे. शैक्षणिक वर्तुळातून याला तीव्र विरोध होत आहे; मात्र विरोध केवळ भावनिक होऊ न घेता वास्तव समजून घेण्यात यावे.