पुणे येथे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांची थकित वीजदेयके भरा !

कोट्यवधी रुपयांची देयके थकित का रहातात ? थकित वीजदेयके भरण्यासाठी आदेश का द्यावे लागतात ? ती वेळोवेळी का भरली जात नाहीत ? हेही पहायला हवे !

राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्यांच्या तिकिटाचे दर दिवाळीपुरते वाढणार !

राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्यांच्या तिकिटाचे दर दिवाळीच्या सुट्ट्यांपुरते १० टक्क्यांनी वाढणार आहेत. ही हंगामी भाडेवाढ २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल.

अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या शेतकर्‍यांना एकूण ७५५ कोटी रुपयांचे साहाय्य !

राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतीवृष्टीमुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झालेल्या शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी एकूण ७५५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ३ हेक्टरपर्यंतच्या हानीसाठी प्रत्येक हेक्टरी १३ ते ३६ सहस्र रुपये देण्यात येतील.

बड्या थकबाकीदारांची कर्जवसुली नाममात्रच ! – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

बड्या कर्जदारांची नावे घोषित करण्यास ‘कॅनरा बँके’चा नकार !

मुंबईत ६ मासांत १० सहस्रांहून अधिक बेवारस चारचाकी आढळल्या !

बेवारस वाहनांमध्ये सर्वाधिक १ सहस्र वाहने ग्रँटरोड परिसरातील आहेत. वांद्रे आणि खार येथे ७०८, कुर्ला ७९५, भायखळा ६७३, वडाळा आणि माटुंगा येथून ६११ गाड्या कह्यात घेण्यात आल्या.

महाराष्ट्रातही समान नागरी कायदा येईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

गोवा आणि उत्तराखंड येथे समान नागरी कायदा आहे. महाराष्ट्रातही समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक राज्य तसा प्रयत्न करेल. तो आला पाहिजे आणि येईल. राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये तसे आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 

मुंबईच्या सुशोभिकरण प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मान्यता !

मुंबई सुशोभिकरण प्रकल्प आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. सुशोभिकरण प्रकल्पाच्या अंतर्गत रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा आणि आकर्षक प्रकाशयोजना या प्रमुख पालटांसह एकूण १६ विविध प्रकारची कामे केली जाणार आहेत.

शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन करणारे बडतर्फ ११८ एस्.टी. कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी आंदोलन केल्याने बडतर्फ करण्यात आलेल्या ११८ एस्.टी. कर्मचार्‍यांना १३ ऑक्टोबरपासून सेवेत रुजू करून घेण्यात आले. मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयी निर्णय घेतला होता.

शेतकरी साहाय्यापासून वंचित राहिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील !

आतापर्यंत पिकांची हानी झाल्यानंतर हानीभरपाई देणार्‍या विमा आस्थापनांकडून शेतकर्‍यांची अनेक वेळा फसवणूक करण्यात आली आहे. तरीही सरकार आस्थापनांच्या व्यवस्थापकांवर कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे या आस्थापनांचे फावते आणि ते वारंवार शेतकर्‍यांची फसवणूक करतात.

भायखळा (मुंबई) येथे ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत ‘शिवसेना शिवसेना’ हे गाणे वाजवले !

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी ‘आतंकवाद्यांशी लढतांना शहीद झालेले लष्करातील औरंगजेबसारखे जवान आमचे बंधू आहेत’, असे म्हटले होते. या दसरा मेळाव्याला अनेक मुसलमान शिवसैनिकांची उपस्थिती होती.