कणकवलीत मुंबई-गोवा महामार्गाचे काम चालू असलेल्या ठिकाणचा संरक्षक पत्रा कोसळून दुचाकीस्वार घायाळ 

मुंबई-गोवा महामार्गावर पूलाचे काम चालू असतांना पटवर्धन चौकात बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या खाली लावलेले संरक्षक पत्रे पडून एक दुचाकीस्वार युवक घायाळ झाला.

कणकवली बाजारपेठेतील दोन दुकाने जळून खाक

बाजारपेठेतील झेंडाचौक येथे ४ जानेवारीला पहाटे लागलेल्या भीषण आगीत ‘जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊस’ अन् ‘रामचंद्र उचले किराणा आणि आयुर्वेदिक दुकान’ ही दोन दुकाने जळून खाक झाली.

‘शिवशाही’ वातानुकूलित शयनयान सेवा एस्.टी. महामंडळाकडून बंद

एस्.टी. महामंडळाला सातत्याने होत असलेल्या तोट्यामागे कुणाचे आर्थिक लागेबांधे आहेत का ?, तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यय करून केवळ अडीच वर्षांत ही सेवा बंद करण्याची वेळ का आली ? याचे चिंतनही एस्.टी. महामंडळाने करावे.

पाचवाडा, उसगाव येथील श्री आदिनाथ देवस्थानचा आज कालोत्सव

पाचवाडा, उसगाव येथील श्री आदिनाथ देवस्थानचा कालोत्सव ५ जानेवारीपासून साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक विधी होणार आहेत. कालोत्सवानिमित्त श्री आदिनाथ देवस्थानची माहिती जाणून घेऊया.

बुलढाणा येथे कागदपत्रे मागणार्‍या विद्यार्थ्याचा महिला प्राचार्याकडून शिवीगाळ करून अवमान 

विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे तर दूरच; पण त्यांना शिवीगाळ करून अवमानित करणारे असे शिक्षक म्हणजे शिक्षण क्षेत्राला कलंकच आहेत.

सर्व शहरांचे नामांतर करणे योग्य नाही ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री या नात्याने धरसोड वृत्ती सोडून ठाम भूमिका घ्यावी.

सांगली-मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून ‘पुस्तक बँक’ चालू !

‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ आणि ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने पुस्तक दान हा उपक्रम हाती घेतला आहे.

माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे निधन

राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर याचे आज पहाटे ४.४५ वाजता निधन झाले. आपला नेता हरपल्याने दक्षिण कराड येथील जनता, रयत संघटनेचे कार्यकर्ते भावूक झाले.

सांगोला रेल्वे स्थानकातून देहलीसाठी दुसरी किसान रेल्वे प्रारंभ

शेतकर्‍यांचा किसान रेल्वेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याने, तसेच वरिष्ठांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले असून सांगोला रेल्वे स्थानकातून देहलीसाठी दुसरी किसान रेल्वे चालू झाली असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.

कोल्हापुरात ‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’ या मोहिमेस प्रारंभ

‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’, या मोहिमेला ३ जानेवारी या दिवशी प्रारंभ करण्यात आला. यात ५० स्वयंसेवी संस्थांसमवेत ५०० हून अधिक वृक्षप्रेमी सहभागी झाले होते.