माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे निधन

माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर

सातारा – राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर याचे आज पहाटे ४.४५ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्ह्यासह कराड दक्षिण मतदारसंघावर शोककळा पसरली. आपला नेता हरपल्याने दक्षिण कराड येथील जनता, रयत संघटनेचे कार्यकर्ते भावूक झाले.

मागील काही दिवसांपासून विलासकाका पाटील-उंडाळकर यांची प्रकृती चांगली नव्हती. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सातारा येथे उपचार चालू करण्यात आले होते. उपचार चालू असतांनाच त्यांचे निधन झाले. कराड येथून त्यांच्या गावी उंडाळे येथे पार्थिव नेणार असून तेथेच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.