पाचवाडा, उसगाव येथील श्री आदिनाथ देवस्थानचा आज कालोत्सव

पाचवाडा, उसगाव येथील श्री आदिनाथ देवस्थानचा कालोत्सव ५ जानेवारीपासून साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक विधी होणार आहेत. कालोत्सवानिमित्त श्री आदिनाथ देवस्थानची माहिती जाणून घेऊया.

श्री आदिनाथ देव

पाचवाडा, उसगाव येथे सोळाव्या शतकात त्या वेळच्या ग्रामस्थांनी श्री आदिनारायण देवस्थानची स्थापना केली. आदि म्हणजे सूर्य, नाथ म्हणजे नारायण. आदिनाथ म्हणजे सूर्यनारायण असे असले, तरी येथील आदिनाथ हा दत्ताचा अवतार असल्याचे मानले जाते. या देवस्थानात प्रत्येक गुरुवारी भजनी उत्सव साजरा केला जातो. श्रीरामनवमीही उत्साहात साजरी केली जाते. दुपारी कीर्तन आणि रामजन्म सोहळा होतो. रात्री नाट्यप्रयोग सादर केला जातो.

कालोत्सवाच्या दिवशी श्री आदिनाथाला अभिषेक केला जातो. इथली स्थानिक देवी श्री भूमिकादेवीला मोठ्या थाटात आदिनाथाच्या दर्शनाला आणले जाते आणि देवी इथे तीन-चार दिवस वास्तव्य करते, अशी आख्यायिका आहे. अनेक भाविक या ठिकाणी देवीची ओटी भरतात. सर्व ग्रामस्थ या दिवसांत श्री आदिनाथाचे दर्शन घेतात.

श्रींच्या वार्षिक कालोत्सवाच्या निमित्त धार्मिक विधी

कालोत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी आणि रात्री पारंपरिक काला होणार आहे. सकाळी श्रींस अभिषेक होणार आहे.

सर्व भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, अशी विनंती श्री आदिनाथ देवस्थान समितीने केली आहे.

संकलक – सौ. सविता चं. तिळवे, उसगाव, गोवा.

जत्रोत्सवाच्या कालावधीत कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचे आवाहन

यावर्षी जत्रोत्सव कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर साध्या पद्धतीने कोरोनाविषयीचे नियम पाळून साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे जत्रोत्सवाच्या दिवशी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाविषयीचे नियम पाळून दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.