सीमालढ्यात मराठी माणसांची एकजूट दाखवूया ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सीमा लढ्याचा वसा आणि वारसा मला मिळाला आहे.

खेड येथील होळकरांच्या वास्तूला संवर्धित स्मारकाचा दर्जा द्यावा – विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर

या वास्तूला संवर्धित स्मारकाचा दर्जा द्यावा, तसेच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५० कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे

दैनिक तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांना पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार

दैनिक तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांना ‘ग्रुप ऑफ मीडिया कोल्हापूर’ यांच्या वतीने पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गोवंशियांचे मांस घेऊन जाणार्‍या २ धर्मांधांवर गुन्हा नोंद

पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथे गोवंशियांची अवैधपणे कत्तल करून ३ सहस्र ५०० किलो मांस वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी धर्मांध टेम्पोचालक सुफियान अन्सारी आणि अश्फाक मोहम्मद यांना कह्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

दत्त जयंतीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड येथे विविध उपक्रमांचे आयोजन

दत्त जयंतीनिमित्त १० डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत पिंपरी, चिंचवड आणि नाशिक रस्ता विभागात प्रबोधन मोहीम घेण्यात आली. या मोहिमेमध्ये दैनिक सनातन प्रभातचे वाचक, धर्मप्रेमी, हितचिंतक, नातेवाईक आणि जिज्ञासू असे एकूण १३६ जण सहभागी झाले होते.

पुणे येथे महिलांनीच बचत गटातील महिलांचे लाखो रुपये हडपले

माले (ता. मुळशी) येथील महिला बचत गटाच्या नावाखाली गेल्या ३ वर्षांपासून ४८ महिलांची अनुमाने साडेसोळा लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या सविता भोलेनाथ घाग आणि स्वाती शिवाजी कदम यांना अटक केली आहे.

पुणे येथे हॉटेलच्या वेटरकडून ग्राहकाची आर्थिक फसवणूक

पिंपरी-चिंचवडच्या लांडेवाडी चौकातील मधुबन बार अँड रेस्टराँमध्ये जेवण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करून त्यातून ९४ सहस्र ५०० रुपये काढून आर्थिक फसवणूक करण्यात आली.

कोल्हापुरातील प्रसिद्ध फौजदारी वकील दिलीप मुंदरगी यांचे निधन

कोल्हापुरातील प्रसिद्ध फौजदारी वकील दिलीप मुंदरगी (वय ६० वर्षे) यांचे ७ जानेवारी या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते.

२५ जानेवारीपासून मंत्रालय आपल्या दारी या मोहिमेचा कोल्हापूर येथून प्रारंभ

राज्यातील सर्वच विभागीय सहसंचालक कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालय आपल्या दारी अभियानाचा आरंभ २५ जानेवारी या दिवशी कोल्हापूर येथून करण्याच्या सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता यांना दिले.

गंगावेस-शिवाजी पूल रस्त्याचे काम हेतूपुरस्सर कासवगतीने करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करा ! – आखरी रास्ता कृती समितीचे महापालिका आयुक्तांना निवेदन

गंगावेस-शिवाजी पूल रस्त्याचे काम हेतूपुरस्सर कासवगतीने करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले.