पुणे येथे महिलांनीच बचत गटातील महिलांचे लाखो रुपये हडपले

महिलांची नीतीमत्ता खालावत असल्याचे दर्शवणारे उदाहरण !

पुणे – येथील माले (ता. मुळशी) येथील महिला बचत गटाच्या नावाखाली गेल्या ३ वर्षांपासून ४८ महिलांची अनुमाने साडेसोळा लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या सविता भोलेनाथ घाग आणि स्वाती शिवाजी कदम यांना अटक केली आहे. त्यांना ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

त्यांनी ३ वर्षांपूर्वी सियाराम या नावाने महिला बचतगट चालू केला होता. त्यामध्ये सविता घाग या अध्यक्षा, तर स्वाती कदम या सचिव होत्या. ग्रामीण भागातील महिला कष्ट करून मिळवलेले पैसे प्रतीमास १ सहस्र याप्रमाणे जमा करत होत्या; पण या दोन महिला बँकेत खाते काढण्यास टाळाटाळ करत होत्या. यावरून संशय आल्याने महिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. (यावरून महिलांना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांची नीतिमत्ता खालावत चालली आहे हेच लक्षात येते – संपादक)