सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी त्वरित त्यागपत्र द्यावे ! – भाजप महिला मोर्च्याची मागणी

धनंजय मुंडे यांनी तक्रारदार महिलेच्या बहिणीशी असलेल्या विवाहबाह्य संबंधांची स्वीकृती दिली आहे. मुंडे यांना ५ अपत्ये असल्याची वस्तूस्थिती निवडणूक आयोगापासून लपवून ठेवून त्यांनी निवडणूक आयोग आणि जनता यांची फसवणूक केली आहे.

मुंबईत साहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मांजाने गळा चिरला

चिनी नायलॉन मांजाचे विक्रेते आणि ग्राहक यांच्यावर कठोर कारवाई कधी होणार ?

महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतींचे निकाल लागण्यास आरंभ

१६ जानेवारी या दिवशी पार पडलेल्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागायला आरंभ झाला आहे. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा येथील काही निकाल आता समोर येत आहेत.

महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाचे २० सहस्र खटले प्रलंबित आणि अनेक पदे रिक्त !

अशा आयोगाचा असून उपयोग तरी काय ? हा सरकारवर भारच आहे. असे आयोग पोसायचे तरी कशाला ? ज्या संस्था चालवता येत नसतील, तर दिखाऊपणासाठी त्या चालवणे म्हणजे सामान्य जनतेला आशेवर ठेवून तिची फसवणूक करणेच नव्हे काय ?

नंदुरबार येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी ध्वनीक्षेपक लावल्याच्या कारणावरून पोलिसांकडून ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

मोहरम आदी प्रसंगी निघणार्‍या मिरवणुकांनी तर नंदुरबारमध्ये विक्रम स्थापित केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उघडपणे उल्लंघन करून अजान देणार्‍या भोंग्यांवरही कारवाई करण्याचे धाडस पोलिसांनी दाखवावे, अशी जनतेची अपेक्षा आहे !

‘कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच !’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मादिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

औरंगजेब हा धर्मनिरपेक्ष नव्हे, तर धर्मांध आक्रमक होता ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल, तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत. हे वागणे ‘धर्मनिरपेक्ष’ नव्हे,’ अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षावर केली आहे.

मगो पक्षाची नूतन केंद्रीय समिती घोषित

१७ जानेवारीला झालेल्या केंद्रीय समितीच्या निवडणुकीत श्री. दीपक ढवळीकर ४०९ मतांनी विजयी ठरल्याने त्यांची पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली.

बेळगाव येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेलेले आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी रोखले

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर कोगनोळी टोलनाक्यावर अडवले. त्यांनी कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला आहे.

औरंगजेबाप्रती प्रेम कशासाठी ?

औरंगाबादला संभाजीनगर संबोधणे आणि नामांतर करणे हा तेथील नागरिकांच्या अस्मितेचा विषय आहे.छत्रपती संभाजी महाराजांना महत्त्व द्यायचे कि औरंगजेबाला ?, असा प्रश्‍न शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.