सत्कर्माने अभिमान मरत नाही, भगवन्नामाने आणि सत्संगतीने तो मरतो !

जे आपण दुसर्‍यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे. माझे कर्तेपण मेल्याखेरीज भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माच्या वेळी त्याचे स्मरण करूया.

ईश्वरप्राप्तीसाठी समर्पण भाव कसा असायला हवा ?

नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा आणि ते ऐकणारा दोघेही उद्धरून जातात. भक्ताचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते; म्हणून जड जीवांना तारणारे नामस्मरणच आहे.

सणांद्वारे निसर्गाप्रती कृतज्ञ रहायला शिकवणारा हिंदु धर्म !

श्रावण शुक्ल पंचमी या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. हिंदु धर्म नागपंचमीच्या दिवशीच्या या पूजनातून ‘सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वर आहे’, हे शिकवतो.

जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे !

जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की, परमेश्वर सुटला.’

भगवंताच्या नामाचा सदोदित ध्यास हवा !

आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसर्‍या टोकाला आहोत. त्याच्या नामाने त्याला जवळ जवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल, तितका भगवंत आपल्या जवळ येईल. भगवंताच्या नामातच सत्संगती आहे.

मंत्रामुळे (नामजपामुळे) स्वतःभोवती एक सुरक्षा कवच सिद्ध होते !

मंत्रामुळे/जपामुळे तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते. म्हणूनच त्याला ‘मंत्र कवच’ म्हणतात. मंत्रामुळे स्वतःभोवती एक सुरक्षा कवच सिद्ध होते. नामात साधक एकरूप होत असल्याने अहंकाराचा नकळत लय होतो.

परमार्थसाधना आणि अनुसंधान

आत्मारामाच्या अखंड स्मरणामध्ये जगणे, म्हणजेच समाधानरूप अवस्था आणि आत्मारामाला चिकटून रहाता येईल, असे मन सिद्ध करणे, हीच परमार्थसाधना होय.

श्री शंकर महाराजांची मनोभूमिका

सामाजिक, धार्मिक, नैतिक अधिष्ठान गुरूंमुळे प्राप्त होते; पण ते अधिष्ठान विसरून लोक केवळ लौकिक सुखाच्या मागे लागल्याने सत्य-नीती हा धर्म होण्याऐवजी पैसा हा धर्म झाला आहे. गुरूंना ईश्वर मानून त्यांचे अधिष्ठान जपले पाहिजे.

नाम घेणे म्हणजे सद्गुरूंच्या हातात स्वतःचा हात देणे होय !

एका नामामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी लागणारे सर्व गुण आहेत.

आद्यशंकराचार्य जयंती

‘आद्यशंकराचार्यांमुळेच आमचा सनातन हिंदु धर्म टिकला. त्यांनी सर्व पाखंड मतांचे खंडण केले. आसेतू हिमाचल प्रवास करून देशाच्या चार दिशांना चार पिठे स्थापली. त्यांनी प्रस्थानत्रयी आणि अन्य विपुल ग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी हिंदुस्थान एकात्म केला.’