समाधान केव्हा मिळते ?
‘भोग प्रारब्धाने येतात’, असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात’, असे म्हटले की, समाधान मिळेल.
‘भोग प्रारब्धाने येतात’, असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात’, असे म्हटले की, समाधान मिळेल.
जो जिवंतपणी वासनारहित राहिला, त्याला सुख-दु:ख नाही. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे. असे रहाण्याने वासना क्षीण होईल.
कुणात कोणतेही गुणदोष असोत, त्याने निष्ठेने नाम घेतले की, त्याचे काम बिनचूक होऊन तो ध्येय गाठतो.
बाहेरील वस्तू मिळो वा न मिळो, ती वस्तू मिळाल्यानंतरही तिची अवस्था कशीही असली, तरी आपले समाधान आणि सुख भंग पावत नाही, अशी अमोलिक अंतर्वस्तू विचारांच्या मुळाच्या शोधातून प्राप्त होते. या परममूल्यवान आंतरिक रत्नालाच परमार्थात ‘वस्तू’ म्हटलेले आहे.
नाम हे सर्व साधनांत स्वाक्षरीसारखे आहे. हुकूम कितीही कडक असेना का; परंतु त्याच्याखाली जर स्वाक्षरी नसेल, तर त्या हुकुमाला महत्त्व नाही.
हिंदूंच्या आणि जगभरातील मानवांच्या सद्यःस्थितीवरील एकमेव उपाय म्हणजे अध्यात्म विश्वविद्यालय !
‘यु.ए.एस्.’ या उपकरणाला ‘ऑरा स्कॅनर’ असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकांची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्यांची प्रभावळ मोजता येते.
आपण नामाची जागृती ठेवली, तर विकारांना बाहेर पडता येणार नाही.
एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय ? काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो.
आपल्या हृदयात प्रभुप्रेम भरा. नित्य नवीन, नित्य नूतन आत्मप्रकाश आणि प्रेमप्रसाद यांनी हृदयस्थ हरीची स्नेहाने नेहमी पूजा करत रहा.