नित्य नामस्मरण केल्यावाचून अंती ते येणार नाही. जागेपणी अभ्यास केला, तर झोपेच्या वेळी स्मरण येईल. झोपेच्या वेळी स्मरण झाले, तर रात्री स्वप्नात तेच होईल आणि असा सदोदित ध्यास ठेवला, तर मरणाच्या वेळीही तेच स्मरण राहील.
आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसर्या टोकाला आहोत. त्याच्या नामाने त्याला जवळ जवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल, तितका भगवंत आपल्या जवळ येईल. भगवंताच्या नामातच सत्संगती आहे.
– श्री. सुभाष भवाडकर
(‘पू. (प्रा.) के.वि. बेलसरे यांचे आध्यात्मिक सामर्थ्य’ या फेसबुकवरून साभार)