जे आपण दुसर्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे. माझे कर्तेपण मेल्याखेरीज भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माच्या वेळी त्याचे स्मरण करूया. लाभाच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो आणि तोट्याच्या वेळी दैव आठवते; म्हणून दोन्ही प्रसंगी कर्तेपण नसावे. देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे, असे मानावे. खोटे कर्तेपण घेतल्यामुळे खरे रडावे लागते. अर्भकाप्रमाणे निरभिमान असावे. ‘मनुष्याचे हाती काही नाही, सर्व रामाच्या हाती आहे. यश देणे न देणे तुझ्या हाती आहे’, असे म्हणून श्रीरामास शरण जावे. सत्कर्माने अभिमान मरत नाही, भगवन्नामाने आणि सत्संगतीने तो मरतो.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. प्रा. के.व्ही. बेलसरे यांचे आध्यात्मिक साहित्य’ या फेसबुकवरून साभार)