पंढरीची वारी : महाराष्ट्राचे ऐश्वर्य आणि वडिलोपार्जित वारसा !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून गेली साडेसातशे वर्षे वारीचे उल्लेख संत वाङ्मयात शेकडो वेळा आढळतात. ‘संत नामदेवांनीही संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील सिदोपंत हे लग्न झाल्यावर पंढरपूरला दर्शनासाठी आले. त्या वेळी पंढरपूर येथे यात्रा भरली होती’, असे म्हटले होते.