मिरज शहरप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी केली ५ सहस्र शिवसेना सदस्य नोंदणी !
शिवसेना मिरज शहरप्रमुख श्री. विशालसिंग राजपूत यांनी मिरज शहरात शिवसेना सभासद नोंदणी अभियान राबवले. यात ५ सहस्र सभासदांची नोंदणी करण्यात आली.
शिवसेना मिरज शहरप्रमुख श्री. विशालसिंग राजपूत यांनी मिरज शहरात शिवसेना सभासद नोंदणी अभियान राबवले. यात ५ सहस्र सभासदांची नोंदणी करण्यात आली.
येत्या २६ जानेवारी २०२१ या दिवशी वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचे म्हटले जात आहे. याविषयी केंद्रस्तरावरून, तसेच स्थानिक नेतेही सांगत आहे. या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर या विमानतळाच्या नामकरणावरून नवा वाद चालू झाला आहे.
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम्.आय.डी.सी. येथे आयुर्वेद संशोधन प्रकल्प संमत करण्यात आला; मात्र तो लातूर येथे हालवण्याच्या हालचाली चालू होत्या. या पार्श्वभूमीवर आयुर्वेद संशोधन प्रकल्प आता दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथेच होणार आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२१’ भेट देण्यात आले.
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष ७ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध केला. याला २१ डिसेंबर या दिवशी ३५२ वर्षे पूर्ण झाली. हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून ओळखला जातो. या दिनाच्या निमित्ताने शिवप्रेमींनी ठिकठिकाणी शिवप्रतापाचा जागर केला.
ही यात्रा २६ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता सांगली येथील शिवतीर्थ, मारुति चौक येथून प्रारंभ होईल, अशी माहिती या यात्रेचे प्रमुख निमंत्रक आणि शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख श्री. हरिदास पडळकर यांनी दिली.
शिवसेनेचे लोकप्रिय नेते माजी खासदार मोहन रावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गोवा येथे निधन झाले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री. सागर चोपदार आणि श्री. सतीश सोनार यांनी विविध आमदारांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट दिले.
तालुक्यातील सांगवे सोसायटीच्या रास्त भाव धान्य दुकानाची अनुज्ञप्ती जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी रहित केली आहे. याविषयी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांनी दिली.
विधीमंडळाचे सार्वभौम अधिकार आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसीला उत्तर न देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव १५ डिसेंबर या दिवशी विधानसभेत एकमताने संमत करण्यात आला.