मिरज शहरप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी केली ५ सहस्र शिवसेना सदस्य नोंदणी !

मिरज (जिल्हा सांगली) – शिवसेना मिरज शहरप्रमुख श्री. विशालसिंग राजपूत यांनी मिरज शहरात शिवसेना सभासद नोंदणी अभियान राबवले. यात ५ सहस्र सभासदांची नोंदणी करण्यात आली. ती नोंदणी पत्रे जिल्हाप्रमुख श्री. संजय विभूते आणि गृहराज्यमंत्री श्री. शंभुराज देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली. या वेळी श्री. विशालसिंह राजपूत यांचा शंभुराज देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.