साई मंदिरात हार फुले नेण्यास अनुमति नसल्याने सुरक्षारक्षक आणि फुलविक्रेते यांच्यात धक्काबुक्की !

शिर्डी – कोरोनाच्या संसर्गानंतर राज्यातील मंदिरांमध्ये हार-फुले नेण्यास अनुमती दिली असली तरी शिर्डी संस्थानने साई मंदिरात हार-फुले नेण्यास अद्यापही अनुमती दिलेली नाही. त्यामुळे मंदिराच्या या भूमिकेला स्थानिक विक्रेते आणि भाविक यांनी आवाहन दिले आहे. संतप्त फुल विक्रेते आणि भाविक यांनी मंदिरात हार-फुले नेण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षारक्षकांसमवेत त्यांचा वाद होऊन धक्काबुक्की झाली. ग्रामस्थ आणि विक्रेते गेल्या काही दिवसांपासून मंदिर प्रशासनाच्या या भूमिकेच्या विरोधात आंदोलन करत आहेत. भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी या प्रकरणात राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे.