सुप्रसिद्ध गायक श्री. अजित कडकडे यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने घेतलेली सदिच्छा भेट !

ऑडिटोरियममध्ये, मंदिरांमध्ये किंवा संतांच्या समोर गाणे म्हणणे’, यांमध्ये पुष्कळ भेद आहे. ‘या सगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्पंदने जाणवतात’, हे खरेच आहे.तुम्ही ते वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करून दाखवू शकत आहात.

पू. अशोक पात्रीकरकाका यांनी प.पू. भक्‍तराज महाराज यांनी स्‍वत: रचलेली भजने म्‍हटल्‍यावर त्‍याचा वाईट शक्‍तींचा त्रास असणार्‍या आणि नसणार्‍या साधकांवर झालेला सूक्ष्म परिणाम !

पू. अशोक पात्रीकरकाका यांनी म्‍हटलेल्‍या भजनांचा साधकांवर सूक्ष्म स्‍तरावर काय परिणाम झाला हे या लेखातून पाहुया.

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने त्‍यांचे गुरु प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍यासारख्‍या अत्‍युच्‍च पातळीच्‍या संतांचा लाभलेला सहवास !

आज वसंतपंचमी (२६.१.२०२३) या दिवशी प.पू. भक्‍तराज महाराज यांचा प्रकटदिन आहे. त्‍या निमित्ताने…

मुलावर लहानपणापासून साधनेचे संस्‍कार करणारे सांगोला (जिल्‍हा सोलापूर) येथील श्री. संतोष पाटणे आणि सौ. शुभांगी पाटणे !

पौष कृष्‍ण पंचमी (१२.१.२०२३) या दिवशी सौ. शुभांगी पाटणे यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्‍यांचा मुलगा श्री. दीप पाटणे रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतो. त्‍याला आई (सौ. शुभांगी पाटणे) आणि वडील (श्री संतोष पाटणे) यांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवम् पारमार्थिक सेवा ट्रस्ट’ यांच्या वतीने आयोजित औदुंबर भंडारा भावपूर्ण वातावरणात पार पडला !

प.पू. भक्तराज महाराज रचित भजने म्हणण्यात आली. कृष्णा नदीच्या काठावर पादुकांना स्नान घालण्यात आले. दुपारी भंडारा करण्यात आला. या प्रसंगी डॉ. (सौ.) कुंदा आठवले या उपस्थित होत्या.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक आणि पारमार्थिक सेवा ट्रस्टच्या वतीने ‘औदुंबर भंडारा’ !

येथील श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक आणि पारमार्थिक सेवा ट्रस्टच्या वतीने ‘औदुंबर भंडारा’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १ ते ६ डिसेंबर या कालावधीत प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे दर्शन, पूजन आणि भंडारा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन…

प.पू. अच्युतानंद महाराज (भाऊ बिडवई) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पनवेल येथे भजन आणि भंडारा यांचे आयोजन !

या वेळी प.पू. भक्तराज महाराज, त्यांचे गुरु प.पू. अनंतानंद साईश, प.पू. रामानंद महाराज, प.पू. अच्युतानंद महाराज यांच्या छायाचित्रांसमोर नैवेद्य दाखवला. ‘ज्योतसे ज्योत जगाओ’, ही आरती करण्यात आली. यानंतर भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले.

प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाण उत्सव कांदळी (पुणे) येथे भावपूर्ण वातावरणात साजरा !

‘हरि ॐ तत्सत्’ या नामजपाच्या गजरात सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा महानिर्वाण उत्सव कार्तिक कृष्ण पक्ष नवमी, म्हणजेच १८ नोव्हेंबर या दिवशी कांदळी, ता. जुन्नर, जिल्हा पुणे येथील त्यांच्या समाधीस्थळी भावपूर्ण वातावरणात साजरा झाला.

कोटी कोटी प्रणाम !

जन्मा येईन भक्ताकाजासी ।
सदा रक्षण त्यांना मजपाशी ।
प्रभूमुखे कथिले हो मजसी ।
सदा सत्य जिवंत मी जाण । – प.पू. भक्तराज महाराज

प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ

प.पू. भक्तराज महाराज यांच्या बर्‍याच भजनांचे अर्थ अनेक साधकांना पूर्णपणे आकलन होत नाहीत. अर्थ समजून घेऊन भजने म्हटली किंवा ऐकली, तर भजने म्हणण्याचा किंवा ऐकण्याचा आनंद द्विगुणित होतो, तसेच भावजागृतीही लवकर होते.