पू. अशोक पात्रीकरकाका यांनी प.पू. भक्‍तराज महाराज यांनी स्‍वत: रचलेली भजने म्‍हटल्‍यावर त्‍याचा वाईट शक्‍तींचा त्रास असणार्‍या आणि नसणार्‍या साधकांवर झालेला सूक्ष्म परिणाम !

प.पू. भक्‍तराज महाराज

‘१६.१२.२०२० या दिवशी सनातनचे संत पू. अशोक पात्रीकरकाका यांनी प.पू. भक्‍तराज महाराज यांनी स्‍वत: रचलेल्‍या आणि म्‍हटलेल्‍या भजनांपैकी काही भजने संगीत ‘प्रयोग’ म्‍हणून म्‍हटली. हे प्रयोग रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमातील वाईट शक्‍तींचा तीव्र त्रास असणार्‍या साधकांवर आणि वाईट शक्‍तींचा त्रास नसलेल्‍या अन् आध्‍यात्मिक पातळी ६० टक्‍क्‍यांहून अधिक असणार्‍या साधकांवर करण्‍यात आले. प्रयोगाच्‍या वेळी पू. पात्रीकरकाका यांनी ‘गुरुवर माझ्‍या स्‍वप्‍नी आले’ (हे प.पू. रामानंद महाराज यांचे) आणि‘एक तुझे नाम शास्‍त्रांचा आधार’, ‘मजला पागल म्‍हणू नका’ अन् ‘गोविंद लिजो प्रभु गोपाल लिजो’ ही प.पू. भक्‍तराज महाराजांनी रचलेली आणि गायलेली भजने म्‍हटली. या भजनांचा दोन्‍ही गटांतील साधकांवर सूक्ष्म स्‍तरावर काय परिणाम झाला हे आपण या लेखातून पाहुया.

पू. अशोक पात्रीकर

१. पू. पात्रीकरकाका यांच्‍यातील आध्‍यात्मिक गुण, गुणांचे प्रमाण (टक्‍के) आणि पू. पात्रीकरकाकांच्‍या गुणांचा त्‍यांच्‍यावर सूक्ष्म स्‍तरावर होणारा परिणाम

कु. मधुरा भोसले

२. पू. पात्रीकरकाका यांनी म्‍हटलेली भजने, भजने म्‍हणत असतांना पू. पात्रीकरकाकांमध्‍ये जागृत झालेल्‍या भावाचे प्रमाण (टक्‍के) आणि भजने म्‍हणत असतांना पू. पात्रीकरकाकांमध्‍ये जागृत झालेल्‍या भावाचा प्रकार

टीप – साधकांचा जो साधनामार्ग आहे त्‍यानुसार त्‍यांना संबंधित योगमार्गाचे भजन आवडते. त्‍याचप्रमाणे साधकांच्‍या साधनामार्गाशी संबंधित असणार्‍या भजनातून त्‍यांच्‍यावर आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय होण्‍याचे प्रमाण अधिक असते. उदा. भक्‍तीयोगानुसार साधना करणार्‍या साधकाला भक्‍तीयोगाशी संबंधित असणारे भजन अधिक आवडते.

प.पू. भक्‍तराज महाराज

३. पू. पात्रीकरकाका यांनी म्‍हटलेल्‍या भजनांचा वाईट शक्‍तींचा तीव्र त्रास असणार्‍या साधकांवर झालेला परिणाम

टीप १ – मनोदेह : मनोदेहाचा ३० टक्‍के भाग बाह्यमन आणि ७० टक्‍के भाग अंतर्मन म्‍हणजे चित्त असते.
टीप २ – चित्त : वैखरी वाणीतील शब्‍दांचा परिणाम बाह्य मनावर होत असतो. संतांची पश्‍यंती वाणी चालू असल्‍यामुळे त्‍यांनी म्‍हटलेल्‍या भजनांचा परिणाम अंतर्मनावर म्‍हणजे चित्तावर होतो.

४. पू. पात्रीकरकाका यांनी म्‍हटलेल्‍या भजनांचा वाईट शक्‍तींचा तीव्र त्रास नसणार्‍या आणि आध्‍यात्मिक पातळी चांगली असलेल्‍या साधकांवर झालेला परिणाम

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.३.२०२०)

  • सूक्ष्म : व्‍यक्‍तीचे स्‍थूल म्‍हणजे प्रत्‍यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्‍वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्‍या पलीकडील म्‍हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्‍या काही व्‍यक्‍तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्‍या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्‍लेख आहेत.
  • वाईट शक्‍ती : वातावरणात चांगल्‍या आणि वाईट शक्‍ती कार्यरत असतात. चांगल्‍या शक्‍ती चांगल्‍या कार्यासाठी मानवाला साहाय्‍य करतात, तर वाईट शक्‍ती त्‍याला त्रास देतात. पूर्वीच्‍या काळी ऋषिमुनींच्‍या यज्ञांत राक्षसांनी विघ्‍ने आणल्‍याच्‍या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्‍ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्‍यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्‍तींच्‍या त्रासांच्‍या निवारणार्थ विविध आध्‍यात्‍मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.