इंदूर (मध्यप्रदेश) येथील श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक आणि पारमार्थिक सेवा ट्रस्टच्या वतीने ‘औदुंबर भंडारा’ !

।। हरि ॐ तत्सत् ।।

प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुका                               प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुका

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक आणि पारमार्थिक सेवा ट्रस्टच्या वतीने ‘औदुंबर भंडारा’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १ ते ६ डिसेंबर या कालावधीत प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे दर्शन, पूजन आणि भंडारा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा, अशी नम्र विनंती ट्रस्टचे अध्यक्ष श्री. शरद बापट यांनी केली आहे.

गुरुवार, १.१२.२०२२

प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे इंदूर आश्रमातून पुण्याकडे प्रयाण होईल. संध्याकाळी ७ वाजता श्री. अनय दीक्षित (९४२२७५६२५१) यांच्याकडे गुरुपादुकांचे आगमन, दर्शन आणि भंडारा होईल.

शुक्रवार,  २.१२.२०२२

सकाळी ९ वाजता श्री. प्रसाद माने (९४२२४०९०७७) पुणे यांच्याकडे गुरुपादुका पूजन, भंडारा होईल. दुपारी १ वाजता सांगलीकडे प्रयाण आणि त्यानंतर संध्या. ६.३० वा. गुरुपादुकांचे आगमन, दर्शन, भंडारा अन् श्री. तात्या भोसले (९४२२३७८५३४), सांगली यांच्याकडे मुक्काम असेल.

शनिवार, ३.१२.२०२२

सकाळी ७.३० वाजता गुरुपादुकांवर अभिषेक, सकाळी ९.३० वाजता इस्लामपूरकडे प्रयाण होईल. मिलन पॅसिफिक एक्झिक्युटीव्ह हॉल, दत्त टेकडी, पाण्याच्या टाकीसमोर, कामेरी रोड, इस्लामपूर येथे गुरुपादुकांचे पूजन अन् भंडारा होईल. (संपर्क : श्री. उमेश कुलकर्णी (९८९०८२४००५))

दुपारी ४ वाजता औंदुबरकडे प्रयाण होऊन रात्री श्री दत्त महाराज पालखी सोहळा, दीपोत्सव, भंडारा आणि भजन होईल. त्यानंतर सद्गुरु स्वामी नारायणनंदतीर्थ यांच्या मठात मुक्काम होईल.

रविवार,  ४.१२.२०२२

सकाळी ८ वाजता अल्पाहार, चहा, सकाळी ९ वाजता मिरवणुकीने श्री दत्त मंगल कार्यालयाकडे प्रयाण, सकाळी ११ वाजता गुरुपादुकांवर अभिषेक, दुपारी १२.३० वाजता भंडारा

संध्याकाळी ५ वाजता सांगलीकडे प्रयाण होईल. सौ. रेखा जाधव, सांगली यांच्याकडे रात्रीचा भंडारा आणि श्री. तात्या भोसले यांच्याकडे मुक्काम होईल.

सोमवार, ५.१२.२०२२

सकाळी ८ वाजता श्री. धनी लोंढे (९८६०२८९००९) यांच्याकडे नाश्ता, गुरुपादुकांचे पूजन आणि दुपारचा भंडारा अन् १ वाजता पुण्याकडे प्रयाण होईल.

संध्या. ६ वाजता श्री. विनीत निकम, पुणे (९०११०८६१२८) रात्री भंडारा आणि मुकाम होईल.

मंगळवार, ६.१२.२०२२

सकाळी पुण्याहून इंदूरकडे प्रयाण होईल. दुपारी १ वाजता सीमा गरुड, धुळे यांच्याकडे भंडारा आणि रात्री ८ वाजता इंदूर आश्रमात आगमन होईल.

 ।। हरि ॐ तत्सत् ।।