दैनिक ‘ललकार’च्या वतीने पत्रकारनगर येथे पाणपोईचा प्रारंभ !

उन्हाचा तडाखा वाढत असल्याने दैनिक ‘ललकार’च्या वतीने पत्रकारनगर येथे पाणपोई चालू करण्यात आली आहे.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथप्रदर्शन यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद !

श्रीरामनवमीच्या निमित्ताने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाचे स्मरण म्हणून श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मूकपदयात्रा !

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाचे स्मरण म्हणून फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या असा बलीदान मास पाळण्यात येतो. समारोपप्रसंगी प्रतिकात्मक अंत्ययात्रा-मूकपदयात्रा काढण्यात येते.

सांगली महापालिकेचे सभापती निरंजन आवटी यांनी सादर केला ७२५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प !

सर्व नगरसेवकांची मते जाणून घेत याविषयी सूचना देण्यासाठी आणि सदस्यांना अभ्यास करण्यासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी १५ एप्रिलला अंतिम अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे घोषित केले.

२ वर्षांच्या कालावधीत सांगली विधानसभा क्षेत्रात विकासकामांचा डोंगर ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

कायमस्वरूपी ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन’, ‘ऑक्सिजन व्हेंटिलेटर’ यांसह २ वर्षांच्या कालावधीत सांगली विधानसभा क्षेत्रात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे, अशी माहिती भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सांगली महापालिकेतील १ सहस्र ५४८ विद्यार्थ्यांनी पाहिला ‘पावनखिंड’ चित्रपट !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेनुसार ५ सहस्र ५०० विद्यार्थी ‘पावनखिंड’ चित्रपट पहातील.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका दाखवणार महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ‘पावनखिंड’ चित्रपट !

२ सहस्र विद्यार्थ्यांचा व्यय महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी स्वत: करणार आहेत. अन्य कोणी विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवण्यास कुणी इच्छुक असल्यास कृपया महापालिका प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या आयुक्तांनी केले आहे.

गडकोटांवरील इस्लामी अतिक्रमण देशाला धोकादायक ! – नितीन शिंदे, माजी आमदार

महाराष्ट्रातील गडदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले असून गडदुर्गांचे इस्लामी अतिक्रमण म्हणजे इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे. तरी तरुणांनी हे प्रकार वेळीच रोखणे आवश्यक आहे, असे आवाहन भाजपचे नेते श्री. नितीन शिंदे यांनी केले.

ज्वालेच्या स्वागतासाठी सांगलीत भव्य दुचाकी फेरी !

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाच्या स्मरणार्थ बलीदान मासाच्या अखेरीस प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी देण्यात येतो.

‘लोकतंत्र सेनानी संघ’ सांगली यांच्या वतीने ‘लोकतंत्र विजयदिन’ साजरा !

२१ मार्च १९७७ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेली आणीबाणी उठली तो दिवस प्रत्येक वर्षी ‘लोकतंत्र सेनानी संघा’च्या वतीने ‘लोकतंत्र विजयदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.