सांगली महापालिकेचे सभापती निरंजन आवटी यांनी सादर केला ७२५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प !

पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सभापती आणि आयुक्त ‘ई-बाईक’वरून महापालिकेत

सांगली महापालिकेत अर्थसंकल्प सादर करतांना सभापती निरंजन आवटी (फेटा घातलेले), तसेच अन्य

सांगली, ३१ मार्च (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी वर्ष २०२२-२३ चा ७२५ कोटी रुपयांचा जमेचा अर्थसंकल्प ३० मार्च या दिवशी सांगली महापालिकेत सादर केला.

पर्यावरण रक्षणाचा संदेश देत महापालिकेत येतांना आयुक्त आणि सभापती (मध्यभागी)

यापूर्वी निरंजन आवटी आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस हे पर्यावरण रक्षणाचा संदेश देत एकाच ‘ई-बाईक’वरून महापालिका मुख्यालयात पोचले. या वेळी सर्व नगरसेवकांची मते जाणून घेत याविषयी सूचना देण्यासाठी आणि सदस्यांना अभ्यास करण्यासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी १५ एप्रिलला अंतिम अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे घोषित केले.