धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाचे स्मरण म्हणून श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मूकपदयात्रा !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

सांगली, १ एप्रिल (वार्ता.) – श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाचे स्मरण म्हणून फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या असा बलीदान मास पाळण्यात येतो. या मासाच्या समारोपप्रसंगी १ एप्रिल या दिवशी सकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा-मूकपदयात्रा काढण्यात आली.

शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करणारी मूकपदयात्रा

या वेळी पू. संभाजीराव भिडेगुरुजी, सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिंदकर, माजी आमदार श्री. नितीन शिंदे, नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर, धारकरी सर्वश्री हणमंतराव पवार, अंकुश जाधव, अविनाशबापू सावंत, हरिदास कालिदास, मिलींद तानवडे, सचिन पवार, सुनील बेळगावे, नितीन काळे, राजू पुजारी, प्रफुल्ल चव्हाण, श्रीकृष्ण माळी यांसह नागरिक, माता-भगिनी, धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मूकपदयात्रेच्या प्रारंभी ज्वाला हातात घेतलेले पोलीस निरीक्षक सिंदकर, हणमंतराव पवार आणि श्री. नितीन शिंदे (उजवीकडे)

मारुति चौक येथून अंत्ययात्रेचा प्रारंभ होऊन शहरातील विविध मार्गांवरून जाऊन मारुति चौक येथेच अंत्ययात्रेचा समारोप झाला.

धर्मवीर संभाजी महाराज यांची न निघालेली अंतयात्रा.
श्री.शिवप्रतिष्ठान,हिन्दुस्थान सांगली विभाग.

अत्यंयात्रेच्या समारोपप्रसंगी छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिकात्मक चिता पेटवण्यात आली. चितेच्या आजूबाजूला छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते.