‘लोकतंत्र सेनानी संघ’ सांगली यांच्या वतीने ‘लोकतंत्र विजयदिन’ साजरा !

सांगली, २३ मार्च (वार्ता.) – २१ मार्च १९७७ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेली आणीबाणी उठली तो दिवस प्रत्येक वर्षी ‘लोकतंत्र सेनानी संघा’च्या वतीने ‘लोकतंत्र विजयदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाही २१ मार्च या दिवशी सांगली येथे ‘लोकतंत्र सेनानी संघ’ सांगली यांच्या वतीने ‘लोकतंत्र विजयदिन’ साजरा करण्यात आला.

सांगली येथे ‘लोकतंत्र सेनानी संघा’च्या वतीने ‘लोकतंत्र विजयदिन साजरा’ करतांना श्रीकांत शिंदे (उजवीकडे बसलेले), तसेच विविध मान्यवर

लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भारतत्न नानाजी देशमुख यांच्या प्रतिमेस प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे आणि प्रकाशतात्या बिरजे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. श्रीकांत शिंदे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. या प्रसंगी अरविंदराव मराठे, प्रकाश मुळगुंद, अवधूत ठोसर, सुभाष कुलकर्णी, भालचंद्र बापट, विलासराव आपटे यांसह लोकतंत्र सेनानी उपस्थित होते.