सांगली महापालिकेतील १ सहस्र ५४८ विद्यार्थ्यांनी पाहिला ‘पावनखिंड’ चित्रपट !

चित्रपट पहाण्यास आलेल्या विद्यार्थ्यांना खाऊ देतांना सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस
चित्रपट पहाण्यासाठी आलेले महापालिकेचे विद्यार्थी

सांगली, २९ मार्च (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेनुसार ५ सहस्र ५०० विद्यार्थी ‘पावनखिंड’ चित्रपट पहातील. त्यापैकी १ सहस्र ५४८ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी चित्रपट पाहिला. या वेळी पालिका उपायुक्त राहुल रोकडे, आस्थापन अधिकारी अनिल चव्हाण, प्रमोद रजपूत, शिक्षण मंडळाचे गजानन बुचडे आणि शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दानशूर लोकांच्या सहकार्यातून खाऊ देण्यात आला.