सूर्याेदयाच्या वेळचे सृष्टीसौंदर्य टिपून सर्वांना त्यातील आनंद अनुभवता यावा, यासाठी त्याचे छायाचित्रणही करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

भगवंत सर्वव्यापी असतो. चराचर जीवसृष्टीवर, सजीव-निर्जीव सर्वांवर त्याचा कृपाकटाक्ष असतो. सर्वत्रच्या चांगल्या-वाईट पालटांची तो दखल घेतो, हे श्रीमन्नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सहवासात आम्हाला अनेकदा अनुभवायला मिळते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात लागवडीसंबंधी सेवा करतांना अकस्‍मात् झालेले नागदेवतांचे अद़्‍भुत दर्शन !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमाच्‍या लागवड परिसरामध्‍ये एक नागदेवतेचे स्‍थान आहे. साधकांना आश्रम दाखवतांना लागवडीतील नागदेवतेचे स्‍थानही दाखवले जाते. सनातन संस्‍थेकडून अमावास्‍या आणि पौर्णिमा या तिथींना नागदेवतेला नैवेद्य ठेवला जातो.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘रामनाथी आश्रम पाहून वाटले, ‘प्रत्‍येक मंदिर या आश्रमासारखे व्‍हावे.’ दर्शनार्थी आणि साधक यांना धर्मज्ञान देण्‍यासाठी हा आश्रम एक आदर्श आहे. साधकांचा आपलेपणा, समर्पण आणि मार्गदर्शन (Guidance) उल्लेखनीय आहे.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रम हे ऋषीमुनींचे निवासस्थान आहे’, असे वाटते. येथील साधक सर्वांना ज्ञानदान करत आहेत. या आश्रमात आणखी अधिक संशोधने करून सर्वांना आपल्या सनातन शक्तीचा उपयोग होऊ दे. या ठिकाणी ध्यानाचे पिरॅमिड निर्माण केले, तर ते उपयुक्त होईल.

सहसाधकाच्‍या माध्‍यमातून योग्‍य दृष्‍टीकोन समजल्‍यावर तो लगेच कृतीत आणणारा लांजा (जिल्‍हा रत्नागिरी) येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा कु. ऋग्‍वेद जोशी (वय १५ वर्षे) ! 

सेवा करतांना कोणतीही अपेक्षा न ठेवता केल्‍यामुळे पूर्वी माझ्‍या मनात जी सेवा करण्‍याची इच्‍छा असायची, ती सेवा मला करायला सांगायचे आणि माझी इच्‍छा पूर्ण व्‍हायची.

 आनंदी, हसतमुख, सकारात्‍मक आणि शिकण्‍याची वृत्ती असलेला अमरावती येथील श्री. महेश चौधरी !

मनमोकळेपणाने बोलणे, निरागसता, अहं अल्‍प असणे, इतरांना साहाय्‍य करणे, योग्‍य दृष्‍टीकोन असणे, परिस्‍थितीचा स्‍वीकार करणे, सकारात्‍मकता असे गुण मला महेश चौधरीच्‍यामध्‍ये जाणवले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

‘हिंदु सनातन धर्म हा संपूर्ण विश्‍वाला सुख, शांती आणि समृद्धी देणारा आहे’, हे आश्रमात आल्‍यावर मी प्रत्‍यक्ष अनुभवले.

सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रम परिसरातील लादीवर ‘ॐ’ उमटणे

 ‘९.७.२०२३ या दिवशी रात्री ९ वाजता मी सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रम परिसरात फिरत होतो. त्‍या जागी बराच अंधार होता. चालतांना एके ठिकाणी मी अकस्‍मात् थांबलो आणि लादीकडे पाहिले असता मला तेथे ‘ॐ’चा आकार दिसला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रमातील शांती अनुभवण्‍यासारखी असून ती शब्‍दांत सांगता येत नाही. येथे आलेल्‍या प्रत्‍येक वेळी मी अधिकाधिक अंतर्मुख होतो. येथून परत गेल्‍यानंतरही माझी ही अवस्‍था काही आठवडे नव्‍हे, तर काही मासांपर्यंत टिकून असते. मला आश्रमात पुनःपुन्‍हा येण्‍याची ओढ लागलेली असते….

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात आलेल्‍या अनुभूती

ध्‍यानमंदिरात नामजप अतिशय भावपूर्ण होतो. ‘साक्षात् गुरुदेवांसमोर आपण बसलो आहोत’, असे वाटते. मला ध्‍यानमंदिरात सूक्ष्मातून गुरुदेव आल्‍याची अनुभूती आली.’