‘९.७.२०२३ या दिवशी रात्री ९ वाजता मी सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रम परिसरात फिरत होतो. त्या जागी बराच अंधार होता. चालतांना एके ठिकाणी मी अकस्मात् थांबलो आणि लादीकडे पाहिले असता मला तेथे ‘ॐ’चा आकार दिसला. मी माझ्याकडील भ्रमणभाषमधील टॉर्चच्या प्रकाशात त्याची निश्चिती केली, तर लादीवर स्पष्टपणे ‘ॐ’चा आकार उमटलेला दिसला. त्यात विशेष म्हणजे, दुसर्याच दिवशी भगवान शिवाचा ‘सोमवार’ आहे. ‘मला शिवाच्या कृपेमुळेच ‘ॐ’चे दर्शन झाले’, या विचाराने त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.७.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |