रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. अधिवक्‍ता दत्तात्रय सणस (प्रमुख कार्यवाह, हिंदू महासभा, महाराष्‍ट्र कार्यकारिणी), सातारा

अ. ‘रामनाथी आश्रमातील मांडणी अप्रतिम आहे.

आ. येथे सनातन धर्माचे दर्शन घडते.

इ. हिंदु राष्‍ट्र-स्‍थापनेच्‍या कार्यात मी तुमच्‍या समवेत आहे.

ई. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य अवर्णनीय आहे. आश्रमातील सेवा करणार्‍यांचे कार्य पाहून त्‍यांच्‍या कार्यास कोटी कोटी नमस्‍कार !’

२. श्री. राजेंद्र शंकर शिंदे (शहर प्रमुख, महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना), महाबळेश्‍वर, सातारा.

अ. ‘रामनाथी आश्रम पाहून माझ्‍या मनाला शांती वाटली, तसेच माझे मन प्रसन्‍न झाले. येथे मला साक्षात् संतांचे दर्शन झाले.’

३. सौ. वृंदा अजय मुक्‍तेवार (महिला शहर प्रमुख, शिवसेना), अमरावती

अ. ‘आश्रमात पोचताच माझ्‍यात नवचैतन्‍य निर्माण झाले.

आ. आश्रम पाहून माझ्‍यात सकारात्‍मक ऊर्जा निर्माण झाली.

इ. माझ्‍या मनातील उत्‍साह द्विगुणीत झाला, तसेच माझे मन प्रसन्‍न होऊन माझी आध्‍यात्मिक ओढ वाढीस लागली.’

४. श्री. विनीत दि. पाखोडे (अध्‍यक्ष, श्री पिंगळादेवी संस्‍थान, नेर पिंगळाई), अमरावती.

अ. ‘हिंदु सनातन धर्म हा संपूर्ण विश्‍वाला सुख, शांती आणि समृद्धी देणारा आहे’, हे आश्रमात आल्‍यावर मी प्रत्‍यक्ष अनुभवले.

आ. हा आश्रम पुष्‍कळ चैतन्‍यमय आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.६.२०२३)