१. श्री. अनिल धीर (संयोजक, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज), भुवनेश्वर, ओडिशा.
अ. ‘आश्रमातील शांती अनुभवण्यासारखी असून ती शब्दांत सांगता येत नाही.
आ. येथे आलेल्या प्रत्येक वेळी मी अधिकाधिक अंतर्मुख होतो. येथून परत गेल्यानंतरही माझी ही अवस्था काही आठवडे नव्हे, तर काही मासांपर्यंत टिकून असते. मला आश्रमात पुनःपुन्हा येण्याची ओढ लागलेली असते.
इ. आश्रमातील ध्यानमंदिरात काही वेळ बसल्यानंतर ताजेतवाने आणि उत्साहवर्धक वाटते.’
२. श्री. श्रीकांत मोदी (व्यवस्थापकीय संचालक, पी.एस्.एस्.,एन्.), बीदर, कर्नाटक.
अ. ‘मला आश्रमातील सात्त्विकता पहाता आणि अनुभवता आली.’
३. श्री. पळ संतोष कुमार (संस्थापक अध्यक्ष, हिंदू येलुच्ची पेरवाई (हिंदु युवा जागृत मंच)), तंजावुर, तमिळनाडू.
अ. ‘आश्रमातील प्रत्येक साधक दायित्वाने सेवा करतो.
आ. आश्रमात पुष्कळ चैतन्य आहे.
इ. असा आश्रम मी कुठेही पाहिला नव्हता. ‘गुरुकृपेमुळे मला आश्रम पहाण्याची सुवर्णसंधी मिळाली’, असे मला वाटते.’
४. पू. स्वामी चित्तरंजन महाराज (श्री श्री शांती काली आश्रम), त्रिपुरा
अ. ‘आश्रम पहातांना मला पुष्कळ चांगले वाटले. जीवन जगण्यासाठी मला एक नवीन प्रेरणा मिळाली.
आ. त्रिपुरा येथे परत गेल्यावर ‘हिंदु राष्ट्र-स्थापना’ करण्याच्या दिशेने काम करण्याची इच्छा माझ्या मनात जागृत झाली.’
५. ‘आश्रमातील भगवान श्रीकृष्णाचे चित्र पाहून माझे मन शांत झाले आणि श्री विद्याचौडेश्वरीदेवीचे चित्र पाहिल्यावर मला मातेच्या चेहर्यावर हास्य दिसले.’
– सुश्री कनिष्का मोहन तिवारी, जळगाव
६. श्री. प्रसन्ना शेट्टी (शिक्षक, पतंजलि योग शिक्षण), दक्षिण कन्नड, कर्नाटक.
अ. ‘मला आश्रम पहातांना पुष्कळ चांगले वाटले. येथील माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !’
७. डॉ. निशांत दास (सचिव, तरुण हिंदू), धनबाद, झारखंड.
अ. ‘या स्थानाची स्वतःची प्रभावळ (ऑरा) आहे. येथील भक्ती आणि अध्यात्म (साधना) यांमुळे आश्रमात सर्वत्र सकारात्मक स्पंदने आहेत.’
८. श्री. रंजन आर्. सुवर्णा (विभाग प्रमुख, युवा भारत), उडुपी, कर्नाटक.
अ. ‘देवता आणि संत यांच्या कृपाशीर्वादाने येथील साधक प्रत्येक कृती उत्कृष्टरित्या करतात. ‘रामनाथी आश्रमात हिंदु राष्ट्राची स्थापना झाली आहे’, असे मला जाणवले.’
९. श्री. मानस सिंग रॉय (सदस्य, भारतीय साधक समाज), हावडा, बंगाल.
अ. ‘पूर्वीच्या तुलनेत आश्रमातील सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ झाली आहे’, असे मला जाणवले.
आ. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे’, याबद्दलची सकारात्मक भावना माझ्या मनात जागृत झाली.’
‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation) पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. ‘हे सादरीकरण पुष्कळ चांगले होते. ‘साधनेने सात्त्विकतेत वाढ कशी होते आणि तिचा परिणाम निर्जीव वस्तूंवरही कसा होतो ?’, हे दाखवण्याची एक अनोखी पद्धत शिकायला मिळाली.’ – श्री. श्रीकांत मोदी
२. ‘भारतीय शास्त्रीय संगीत आणि भक्तीभाव यांचा सूक्ष्म स्तरावर होणार्या परिणामांतील भेद स्पष्ट करणारे हे सादरीकरण होते.’ – डॉ. निशांत दास, धनबाद, झारखंड.
(सर्व सूत्रांचा दिनांक : १७.६.२०२३)