१. ‘मी मागील ३ वर्षांपासून आश्रमात येत आहे. आश्रमाच्या परिसरातील मंदिरांचे चैतन्य वाढले आहे. श्रीरामशिळा पाहून मला पुष्कळ आनंद झाला. ‘मागील वर्षापेक्षा आश्रमाचे चैतन्य वाढले आहे’, असे जाणवले.’ – श्री. अविनाश मसूती, जिल्हा धारवाड
२. ‘मी मागील ४ वर्षांपासून आश्रमात येत आहे. येथे आल्यावर ‘मला स्वर्गलोकात आलो आहे’, असे वाटत आहे. इथून घरी गेल्यानंतर काम करतांना मला चैतन्य अनुभवता येते.’ – अधिवक्ता मल्लेशाप्पा न. बाडगी, लक्ष्मेश्वर
३. ‘हा आश्रम माझ्या जीवनातील आध्यात्मिक वातावरण असलेले आणि विशेष असे स्थळ आहे. हिंदु राष्ट्रासाठी रात्रंदिवस कष्ट करणारे आमचे सर्व साधक आणि हिंदु कार्यकर्ते यांचा विजय होऊ दे. आश्रमाचे नीती-नियम आदर्श आहेत.’ – श्री. शिवय्या शास्त्री (कार्याध्यक्ष, जयकर्नाटक जनपरा वेदिके ) शिवमोग्गा, कर्नाटक
४. ‘आश्रम हे ऋषीमुनींचे निवासस्थान आहे’, असे वाटते. येथील साधक सर्वांना ज्ञानदान करत आहेत. या आश्रमात आणखी अधिक संशोधने करून सर्वांना आपल्या सनातन शक्तीचा उपयोग होऊ दे. या ठिकाणी ध्यानाचे पिरॅमिड निर्माण केले, तर ते उपयुक्त होईल.’ – श्री. शिवप्रसाद, चंदापुरा, बेंगळुरू, कर्नाटक.
५. ‘देवतांची चित्रे बनवली आहेत. तिथे देवाची शक्ती आहे’, असे वाटले.’ – श्री. शिवकुमार, कर्नाटक
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय
१. ‘माणसाचे कपडे आणि त्यांची छायाचित्रे, तसेच देवतांची चित्रे यांवर पडलेल्या डागांमुळे ‘सूक्ष्मातील दृष्टीचे परिणाम’ याविषयी जाणीव झाली.’ – श्री. नवीन कुमार, शिवमोग्गा, कर्नाटक.
२. ‘डोळ्यांना न दिसणारी अगोचर (स्थिर, अचल) शक्ती आहे. सत्य पहायचे असल्यास साधना करावी लागते.’ – श्री. शिवप्रसाद, चंदापुरा, बेंगळुरू, कर्नाटक.
‘संशोधन’ आणि ‘संगीत’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation (टीप) पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
टीप – हे एक सॉफ्टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवता येतात.
१. ‘देवत्व असते, त्या ठिकाणी भगवंताची अगोचर (स्थिर, अचल) शक्ती असते. त्यामुळे कलाकारालाही ती शक्ती व्यापून टाकते.’ – श्री. शिवप्रसाद, चंदापुरा, बेंगळुरू, कर्नाटक .
२. ‘या संगणकीय प्रणालीमुळे सकारात्मक आणि नकारात्मक शक्ती समजते. सुंदर अनुभव आहे.’ – श्री. शिवय्या शास्त्री (कार्याध्यक्ष, जयकर्नाटक जनपरा वेदिके ) शिवमोग्गा, कर्नाटक
३. ‘ॐ चिन्ह आवडले.’ – श्री. शिवकुमार, कर्नाटक
मान्यवरांना आलेल्या अनुभूती
१. ‘आश्रमाला भेट दिल्यावर माझा देह हलका झाला. पुष्कळ आनंद वाटला आणि मन अध्यात्माकडे झुकल्याचे जाणवले.’ – अधिवक्ता मल्लेशाप्पा न. बाडगी, लक्ष्मेश्वर
२. ‘आश्रम पाहून ‘हे नालंदा विश्वविद्यालय आहे’, अशी अनुभूती आली.’ – श्री. शिवप्रसाद, चंदापुरा, बेंगळुरू, कर्नाटक
(सर्व सूत्रांसाठी दिनांक १६.६.२०२३)
|