१. ‘सनातनच्या आश्रमात पुष्कळ चैतन्य आहे आणि ते सतत प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवते.
२. येथे सर्वांमध्ये पुष्कळ प्रेमभाव आणि गुरुसेवेची तळमळ दिसून आली. ‘हीच तळमळ माझ्यातही येऊ दे’, हीच गुरुचरणी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी) प्रार्थना !
३. बालसाधकांकडे बघून आपल्यातही प्रीती, नम्रता आणि लीनभाव निर्माण होतो अन् त्यांच्याकडून चैतन्य मिळते.
४. ध्यानमंदिरात नामजप अतिशय भावपूर्ण होतो. ‘साक्षात् गुरुदेवांसमोर आपण बसलो आहोत’, असे वाटते. मला ध्यानमंदिरात सूक्ष्मातून गुरुदेव आल्याची अनुभूती आली.’
– श्री. नवनाथ प्रभाकर बर्डे, पुणे (१९.३.२०२३)
|