जीभ

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

जीभेला चिरकाल यौवन प्राप्त झालेले आहे. माणूस हवा तेवढा वृद्ध होवो, देहावर सुरकुत्या पडोत, डोळ्यांनी दिसत नसू दे, तरतरी नाश पावू दे; पण जीभ कधीच म्हातारी होत नाही. तिचा आवेश आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच रहातो. जीभेचे रूप-स्वरूप बरेच लहान आहे; पण या लहानशा इंद्रियावर विजय मिळवणे कठिणातील कठीण काम आहे. मुखम्यानात रहाणारी जीभ ही दुधारी तलवार आहे. ही जीभ ताब्यात रहावी; म्हणून निसर्गाने दातरूपी बत्तीस चौकीदार बसवलेले आहेत; पण जीभ अशी जबरी आहे की, कालांतराने दातांनाही उखडून टाकते, तशीच तोडूही शकते. कुणाला ती घायाळ करते, तर कुणाच्या जखमाही बुजवून टाकते. तिच्यातून अमृत झरते, तसेच हलाहल विषही निर्माण होते. अतीश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो, ज्ञानतंतू थकतात; पण जिभेला असे यौवन प्राप्त झालेले आहे की, तिला कधीच थकवा जाणवत नाही. अनेक प्रकारच्या प्रचंड शक्ती धारण करणार्‍या या इवल्याशा जिभेवर ताबा मिळवणे, हे दुष्कर काम आहे आणि जे लोक जिभेवर ताबा मिळवू शकतात, तितक्याच प्रमाणात ते खरे जीवन जगू शकतात; म्हणून या जिभेला भगवंताच्या नामस्मरणाची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज