
आपण भजनाला लागलो, तर प्रपंच कसा चालेल, याची काळजी करू नये. भजनाला लागल्यावर संत तुकाराम महाराजांसारखे झालो, तर वाईट काय ? बरे तसे न झाले, तर प्रपंच चालूच आहे. प्रपंचात नुसते रडत बसण्यापेक्षा आनंदाने रामनामात राहूया. सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी राहून पहा. मन चिंतारहित होईल, पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल. हे सर्व विश्व आणि प्रपंच ईश्वराचा आहे. प्रपंच ज्याचा आहे त्याला तो देऊन आपण मोकळे व्हावे. अडखळण्याची भीती नाही. जो प्रपंच आपल्याला त्याने भाड्याने दिला आहे, तो आपण आपलाच म्हणून धरून बसतो.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज