सद्गुरु शब्दज्ञान देत नाहीत. भक्ती आणि अखंड आनंद देणे, हे सद्गुरूंचे कार्य. शब्दज्ञान विसरावे लागते. शब्दज्ञान हे अहंकार वाढवणारे भूत आहे. ज्ञानाचे पर्यवसान आनंदात व्हावे. संत चारही योगांचे अधिपती असतात. देतांना ज्याला जे योग्य वाटेल, त्याला ते देतात. मला येते, तेच दुसर्याने केले पाहिजे, असा त्यांचा आग्रह नसतो.
– वि.श्री. काकडे
(साभार : ग्रंथ ‘चिंतन’)