युक्रेनकडून पहिल्या युद्धगुन्हेगार रशियन सैनिकास जन्मठेप !
२१ वर्षीय वादिम शिशिमरिन् असे या रशियन सैनिकाचे नाव असून तो रणगाडा कमांडर आहे. त्याला ६२ वर्षीय ओलेक्सांद्र शेलिपोव्ह यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
२१ वर्षीय वादिम शिशिमरिन् असे या रशियन सैनिकाचे नाव असून तो रणगाडा कमांडर आहे. त्याला ६२ वर्षीय ओलेक्सांद्र शेलिपोव्ह यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचा दावा ‘न्यूज लाइन’ या नियतकालिकात एका ‘ऑडिओ टेप’मधील संभाषणाचा हवाला देत करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी पाश्चात्त्य देशांच्या विचारसरणीत स्वार्थ दडला आहे. त्यामुळे पाश्चात्त्य देशांचे एकमेकांतील संबंध ताणले जातील आणि लवकरच अमेरिकाकेंद्रीत जग इतिहासजमा होईल, अशी चेतावणी रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी येथे केले.
फिनलँड देशाने ‘नाटो’ देशांमध्ये सहभागी होण्याची घोषणा केल्यानंतर रशियाने संताप व्यक्त करत ‘परिणाम भोगायला सिद्ध रहा’ अशी धमकी दिली आहे. फिनलँडची रशियाला लागून जवळपास १ सहस्र ३०० किलोमीटरची सीमारेषा आहे.
पुतिन म्हणाले की, नाटो आमच्या सीमेवर रशियासाठी संकट निर्माण करत आहे. युक्रेनमध्ये आमचे सैन्य संकटांचा सामना करत आहे. आम्ही आमच्या भूमीसाठी युद्ध लढत आहोत.
रशियाच्या सैन्याने ‘डॉल्फिन’ नावाच्या माशांच्या दोन बटालियन तैनात केल्या आहेत. हे डॉल्फिन मासे सागरातील कोणत्याही क्षेपणास्त्रांंचा माग काढू शकतात.
ब्लिंकन म्हणाले की, अतिशय महत्त्वाची ठरण्याची आणि पुढील वाटचाल करण्यातील आधार बनण्याची क्षमता भारत-अमेरिका यांच्यातील भागीदारीत आहे.
पुतिन सेंट पीटर्सबर्ग येथे रशियन खासदारांना संबोधित करत होते.
युक्रेनशी चर्चा चालू राहील; परंतु तिसर्या महायुद्धाचा धोका कायम आहे, असे वक्तव्य रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी नुकतेच केले.
रशियाने ज्या उद्देशाने युद्ध चालू केले होते, तो उद्देश पूर्ण करण्यात रशियाला अपयश आले आहे, तर त्याच वेळी युक्रेन त्याच्या उद्देशात यशस्वी झाला आहे, असे विधान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी केले.