युद्धाचा उद्देश पूर्ण करण्यात रशिया अपयशी ! – अमेरिका

डावीकडे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन

कीव (युक्रेन) – रशियाने ज्या उद्देशाने युद्ध चालू केले होते, तो उद्देश पूर्ण करण्यात रशियाला अपयश आले आहे, तर त्याच वेळी युक्रेन त्याच्या उद्देशात यशस्वी झाला आहे, असे विधान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी केले. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन आणि ब्लिंकेन यांनी कीव येथे जाऊन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांची भेट घेतली. या भेटीनंतर अँटनी ब्लिंकेन यांनी वरील विधान केले. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धास प्रारंभ झाल्यानंतर २ मासांनंतर अमेरिकेचे प्रतिनिधी युक्रेनमध्ये पोचले. त्यांच्या या भेटीवर रशियाकडून अद्याप प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

ब्लिंकेन यांनी पोलंड आणि युक्रेन सीमजेवळ पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आम्हाला युक्रेन सरकार आणि तेथील जनता यांना पाठिंबा देण्याची संधी मिळाली आहे. आमची झेलेंस्की यांच्यासमवेत ३ घंटे चर्चा झाली.