रशियाच्या सैन्याने काळ्या समुद्रात तैनात केली डॉल्फिन माशांची बटालियन !

मॉस्को (रशिया) – युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला २ मास उलटून गेले आहेत. काही दिवसांपूर्वी काळ्या समुद्रात रशियाची ‘मॉस्कवा’ ही युद्धनौका बुडाल्यानंतर काळ्या समुद्रकिनार्‍यावरील क्रिमियाच्या स्वास्तोपोलमध्ये रशियाच्या सैन्याने ‘डॉल्फिन’ नावाच्या माशांच्या दोन बटालियन तैनात केल्या आहेत.

हे डॉल्फिन मासे सागरातील कोणत्याही क्षेपणास्त्रांंचा माग काढू शकतात. रशियाने स्वास्तोपोल प्रकल्प वर्ष २०१४ पासून चालू केला होता. त्या अंतर्गत डॉल्फिनसह ब्लूगा व्हेल या माशालाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. वर्ष २०१९ मध्ये नॉर्वेच्या किनारी ब्लुगा व्हेलमध्ये कॅमेरे लावलेले होते.