रशियातील बंडखोर ‘वॅगनर ग्रुप’ सैन्याने घेतली माघार !

बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी घडवून आणला समेट !
प्रिगोजिन यांच्यावर कोणताही खटला चालवला जाणार नाही !

रशियामध्ये ‘वॅगनर ग्रुप’ सैन्याची बंडखोरी

या सैन्याचे प्रमुख येवगेनी प्रिगोजीन यांनी ‘आम्ही मॉस्कोकडे मार्गस्थ करत आहोत. आमच्या मार्गात येणार्‍यांना धडा शिकवण्यात येईल’, अशी चेतावणी दिली आहे.

रशियाने मित्रराष्ट्र बेलारूसमध्ये पोचवली परमाणु शस्त्रास्त्रे ! – बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष

रशियाने परमाणु शस्त्रास्त्रे बेलारूसमध्ये पोचवली आहेत. ही माहिती बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्सांद्र लुकाशेंको यांनी स्वत: रशियाच्या एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत दिली. त्यांनी सांगितले की, आम्हाला रशियाकडून क्षेपणास्त्रे आणि बाँब मिळाले आहेत.

रशियाकडून पाकला मिळणार्‍या तेलावर भारतात होते शुद्धीकरण प्रक्रिया !

रशियाने पाकच्या समोर ठेवली होती अट !

पाकिस्तानशी व्यापार वाढवण्याची इच्छा ! – रशिया

जिहादी पाकला जगात एकटे पाडण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर चीन कशा प्रकारे विरजण घालत आहे, याचेच हे उदाहरण ! भारत ज्याला मित्र समजतो, तो रशियाही आता भारताला डिवचत आहे, हेच यावरून सिद्ध होते ! सरकार रशियाची कानउघाडणी करणार का ?

चीनच्या विनंतीवरून रशियाने पाकिस्तानला पुरवले कच्चे तेल !

रशिया आणि भारत यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे बोलले जाते; मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू नसतो, तर प्रत्येक जण स्वहित पहात असतात, हे या घटनेतून लक्षात येते. हे लक्षात घेऊन भारताने सर्वच क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे आवश्यक !

युक्रेनमध्ये युद्धातील आक्रमणात फोडण्यात आलेल्या धरणामुळे निर्माण झाली पूरस्थिती !

३० हून अधिक गावे आणि शहरे येथे पूरस्थिती !
रशियाच्या सैन्याच्या विरोधात पुरलेले भूसुरूंगामुळे बचाव कार्यात अडथळा !

जर्मनीत यापुढे रशियाचे दोन दूतावास चालू ठेवण्यास अनुमती !

रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध याआधीच लादले आहेत.

युद्धावर उपाय शोधण्यासाठी भारत शक्य ते करण्याचा प्रयत्न करील ! – पंतप्रधान मोदी

‘जी ७’ देशांच्या वार्षिक शिखर संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही करण्यात आली.