इस्लामाबाद – युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा हे दोन दिवसांच्या पाकिस्तान दौर्यावर आहेत. संकटकाळात रशियाने पाकिस्तानला साहाय्य केले होते. अशा परिस्थितीत युक्रेनच्या परराष्ट्रमत्र्यांच्या या दौर्यावर रशियाने अप्रसन्नता व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या या दुटप्पी भूमिकेमुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन संतापले आहेत.
युक्रेनला शस्त्रे पुरवत नसल्याचा दावा पाकिस्तानने केला असला, तरी पाकिस्तान युक्रेनला थेट शस्त्रास्त्रे पुरवत नसून तिसर्या देशाच्या माध्यमातून पुरवठा करत असल्याचेही काही अहवालात म्हटले आहे. पाकिस्तानने आपली तटस्थ भूमिका सोडून युक्रेनला थेट पाठिंबा द्यावा, अशी इच्छा युक्रेनच्या परराष्ट्रमत्र्यांनी व्यक्त केली.